इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७४ साली महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राज्याचा इतिहास लक्षात घेतला तर अफगाण राजा दुर्राणी, दक्षिणेचा टिपू सुलतान आणि इंग्रज अशा अनेक बलाढ्य शत्रुंनी महाराष्ट्रावर वेळोवेळी हल्ले केले आणि आपली राजवट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड शतकाच्या प्रदीर्घ राजवटीनंतर १९४७ साली भारतात ब्रिटीश सत्तेचा अंत झाला. ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांचे भारतात स्वागत करण्यासाठी १९११ साली मुंबईत उभारण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडिया प्रवेशद्वारातूनच ब्रिटीश भारतातून बाहेर पडले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अशा अनेक दिग्गज नेत्यांनी ब्रिटीशांची भारतातील राजवट संपुष्टात आणण्याच्या कामी मोलाचे योगदान दिले. १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ लेणी ही जागतिक वारसास्थळे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना असून महाराष्ट्राचे वैभव आहेत. ब्रिटीशांच्या काळात राज्यात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि कालांतराने मुंबईसह इतर ठिकाणीही कापड गिरण्यांचा प्रसार झाला. अलिकडच्या काळात या गिरण्यांच्या जागी अनेक आधुनिक उद्योगांनी आपले बस्तान बसवले आहे. महाराष्ट्राची संस्कृती प्रामुख्याने हिंदूप्रधान असून सुमारे ११ टक्के लोकसंख्या मुस्लिम, ६ टक्के बौद्ध आणि एक टक्का लोकसंख्या ख्रिस्तीधर्मीय आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून हीच भाषा राज्यात सर्वात जास्त बोलली जाते.
भौगोलिक माहिती
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या आणि मध्यभागापर्यंत विस्तारलेल्या महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीचा अरबी समुद्र किनारा लाभला आहे. त्याचबरोबर सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांची नैसर्गिक तटबंदीही राज्याला लाभली आहे. राज्याच्या वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक आणि नैऋत्येला गोवा राज्य आहे. प्रशासकीय सोयीसाठी ६ महसूल विभाग आणि ३६ जिल्ह्यांमध्ये राज्याची विभागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र हे लोकसंख्येनुसार देशात दुसऱ्या क्रमांकाचे तर भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यात रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग आणि जलमार्गांचे सक्षम जाळे असून, महाराष्ट्र हे भारतातील उत्कृष्ट शहरीकरण झालेल्या राज्यांमध्ये आघाडीवर आहे.
शासन
राज्यपाल हे राज्याचे संवैधानिक प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ त्यांना वेळोवेळी सल्ला देते. राज्य विधिमंडळाची विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन सदने आहेत. विधानसभेमध्ये बहुमत असलेला पक्ष किंवा काही पक्षांची युती राज्यात सरकार स्थापन करते. विधानसभेत बहुमत असणाऱ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान होतो आणि तो दोन्ही सदनातील सदस्यांमधून आपल्या मंत्रिमंडळ सदस्यांची निवड करतो. निवडणुकीच्या माध्यमातून निवडून न आलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली तर त्या व्यक्तीला पुढच्या सहा महिन्यांत दोन्हीपैकी एका सदनातून निवडून यावे लागते.
विधीमंडळाचे पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होते तर हिवाळी अधिवेशन शक्यतो नागपूरमध्ये होते. वेगाने होणारे आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे राज्यातील सुबत्ता वाढत असल्याचे दिसून येते.
उद्योग
महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून ऊस, कापूस, तेलबिया आणि धान्ये ही मुख्य पिके राज्यात घेतली जातात. राज्यातील साधारण १.५२ कोटी शेतकरी शेतात काम करतात. राज्यातील काही भागांमध्ये शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तिथे सिंचनाच्या विविध पद्धतींचा वापर करून पिके घेतली जातात. राज्यात कोळशासह इतर खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. माल वाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, विमानतळ आणि बंदरे यांचे मोठे जाळे आहे. अलिकडच्या काळात सर्वच पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तार वेगाने होतो आहे. राज्यात शेतीपासून विमान बांधणीपर्यंत विविध क्षेत्रातील उद्योगांची यशस्वी घोडदौड सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी असा उल्लेख केले जाणारे मुंबई, हे राज्याच्या राजधानीचे शहर देशातील महत्वपूर्ण औद्योगिक घडामोडींचे केंद्र आहे.
कायदा आणि सुव्यवस्था
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे. आपत्कालिन परिस्थितीत १०० किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावरून नागरिकांना पोलीसांकडून मदत मागता येते. तुम्ही पोलीसांच्या संकेतस्थळाला भेट देऊन, नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध सेवांचा लाभ घेऊ शकता.
बेपत्ता व्यक्ती, चोरीला गेलेली वाहने, ओळख न पटलेले मृतदेह याबाबतची अद्ययावत माहिती तुम्ही पाहू शकता. तसेच महत्वाची गोपनीय माहिती पोलीसांना कळवू शकता.
राष्ट्रीय कारागृह माहिती पोर्टल
तुमच्या जवळची व्यक्ती तुरूंगात असल्यास तुम्ही भेट घेण्यासाठी ऑनलाइन विनंती करू शकता आणि त्यासंदर्भात तुम्हाला एसएमएस/ईमेल अलर्ट पाठवले जातात. याबाबत काही तक्रार असल्यास ती ऑनलाइन दाखल करता येते. त्याशिवाय कैद्यांनी तुरूंगात तयार केलेली उत्पादनेही तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. या पोर्टलमार्फत नागरिक, तुरूंग, न्यायालये, पोलिस आणि इतर तपास यंत्रणांसाठी सेवा उपलब्ध करून दिली जाते.
येथे क्लिक करा
न्यायव्यवस्था
नागरिकांना न्यायदान करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. राज्यात गरजूंसाठी विनामूल्य कायदेशीर मदत उपलब्ध आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची सद्यस्थिती तुम्ही खालील दुव्यांवर पाहू शकता.
गृहनिर्माण
राज्यातील गृहनिर्माण सुविधा उभारण्यात खाजगी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये जागतिक दर्जाची घरे उभारण्यात येत असली तरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्याही खूप जास्त आहे. राज्यात सर्वच ठिकाणी खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात घरे बांधत आहेत. त्याचबरोबर, कष्टकरी गरीबांना सन्मानाने जगता यावे, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या माध्यमातून बहुमजली लहान सदनिका बांधल्या जात आहेत.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा प्राधिकरणातर्फे राज्यातील नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात तर शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प मार्गी लावले जातात. प्रकल्प बाधित व्यक्तींच्या पुनर्वसनाची जबाबदारी सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पार पाडली जाते. महाराष्ट्र राज्यातील सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर मालमत्ता प्रकल्पांच्या विक्री प्रक्रियेतील पारदर्शकतेची खातरजमा, महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण करते. ग्राहकांचे हीत जपण्याच्या कामी या प्राधिकरणाची भूमिका महत्वाची आहे.
म्हाडा या संक्षिप्त नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरातील जवळपास साडेसात लाख कुटुंबांना परवडणारी घरे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी सुमार अडीच लाख घरे एकट्या मुंबई शहरातली आहेत.
येथे क्लिक करा
झोपटपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत गृहनिर्माण योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे काम, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित करते आहे.
येथे क्लिक करा
राज्याच्या शहरी भागातील सर्वांना घरे प्रदान करण्याच्या सरकारच्या उद्देशाला अनुसरून महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ कार्यरत आहे. राज्यभरात परवडण्याजोगी पाच लाख घरे बांधण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.
येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्यातील सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर मालमत्ता प्रकल्पांच्या विक्री प्रक्रियेतील पारदर्शकतेची खातरजमा, महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण करते. ग्राहकांचे हीत जपण्याच्या कामी या प्राधिकरणाची भूमिका महत्वाची आहे.
येथे क्लिक करा
देयके, ओळखपत्रे, अनुज्ञप्ती, प्रमाणपत्रे – जुने रहिवासी किंवा अभ्यागत
महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशांना आणि भारतीय नागरिकांना सरकारतर्फे काही ओळखपत्रे प्रदान केली जातात. या ओळखपत्रांसाठी अर्ज करण्यासाठीची सविस्तर प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, देयक भरणा आणि इतर सेवांबाबतची तपशीलवार माहिती तुम्हाला येथे पाहता येईल.
परिवहन
वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी सारथी परिवहन
ओळखपत्रे प्राप्त करा
मतदार ओळखपत्र
मतदाराचे छायाचित्र आणि मतदार ओळख क्रमांक असणारे मतदार ओळखपत्र, भारतीय निवडणूक आयोगातर्फे जारी केले जाते. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सज्ञान भारतीय नागरिकांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र हा महत्वाचा दस्तावेज आहे. या ओळखपत्राचा वापर करून भारतीय नागरिक देशातील विविध निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. मतदार ओळख पत्रावर सर्वात वरच्या बाजूला मतदार ओळख क्रमांक - ईपीआयसी क्रमांकाची नोंद केलेली दिसते.
आधार
समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून वित्तसहाय्य प्रदान केले जाते. आधार आणि आधार मंचाच्या माध्यमातून हे वित्त सहाय्य पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचविणे सहज शक्य होते.
पॅन कार्ड
अक्षरे आणि अंकांचा समावेश असणारा कायम खाते क्रमांक अर्थात पॅन क्रमांक भारतीय आयकर विभागातर्फे जारी केला जातो. या क्रमांकाच्या आधारे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेता येतो. एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कर दायित्व निश्चित करण्यासाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
नवीन पॅन कार्डसाठी, दुरूस्ती किंवा अद्यतनासाठी अर्ज करा
पारपत्र
शिक्षण, पर्यटन, तीर्थाटन, वैद्यकीय उपचार, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी पारपत्र हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलच्या माध्यमातून पारपत्र आणि संबंधित सेवा सुलभरित्या आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदाराने नमूद केलेल्या माहितीच्या सत्यापनासाठी राज्य पोलीस आणि पारपत्र वितरणासाठी भारतीय टपाल खात्याबरोबर समन्वय साधून पारपत्र सेवा प्रदान केली जाते.